Just another WordPress site

एकदाही निवडणूक न हरणारे शरद पवार या निवडणूकीत झाले होते पराभूत

पवारांचा पराभव करत हा नेता झाला होता काँग्रेसचा अध्यक्ष, पराभवानंतर पवारांची वेगळी वाट

मुंबई दि २२ (प्रतिनिधी) – आजपर्यंत एकही निवडणूक न गेलेला नेता अशी शरद पवारांची ओळख आहे. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रात अनेक मंत्रिपदाचा अनुभव असलेले आणि पंतप्रधान होण्याची मनीषा बाळगणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीची सारखा छोटासा पक्ष असूनही केंद्रीय राजकारणात त्यांचा दबदबा आहे. पण तुम्हाला हे सांगितल्यास आश्चर्य वाटेल की आजवर एकही निवडणूक न हरणारे शरद पवार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक हरले होते. त्यावेळी झालेली निवडणूक फारच रंजक झाली होती.

देशात १९९६ साली झालेल्या निवडणूकीत पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.त्या निवडणूकीत भाजपला १६१ तर काँग्रेसला १४० जागा मिळाल्या. सोनिया गांधीनी यावेळी राजकारणात येण्याची घोषणा केली. पण अध्यक्ष होण्यास. त्या इच्छुक नव्हत्या त्यामुळे त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर राजेश पायलट यांनी देखील अर्ज दाखल केला. पण याच निवडणुकीसाठी सीताराम येचूरी यांनी देखील अध्यक्ष होण्यासाठी अर्ज दाखल केला. आणि निवडणूकीत चुरस निर्माण झाली. त्यामुळे केशरी विरोधात पायलट आणि पवार यांनी एकत्र येत देशभरात जोरदार प्रचार केला. बेरजेच्या राजकारणात तरबेज असलेले पवार यांनी शीर्ष नेत्यांना भेटत निवडणुकीसाठी मतांची जमवाजमव सुरु केली. केसरींना टक्कर देण्यासाठी शरद पवार आणि राजेश पायलट हे देशभरात फिरले.

पक्षात फारसे लोकप्रिय नसलेले केसरी निवडून येणार नाहीत असे अनेकांना वाटत होते. केंद्रीय मंत्रिपदाचा अनुभव असलेले शरद पवार आणि राजघराण्यातून आलेले पायलट या दोघांमधील एक जण अध्यक्ष होतील अशी अटकळ बांधली जात होती. पण निवडणूकीनंतर जाहीर झालेला निकाल सगळ्यांना चकित करणारा होता. कारण या निवडणूकीत केसरी यांना ६ हजार २२४, पवारांना ८८२ आणि राजेश पायलट यांना ३५४ मते मिळाली. सीताराम केसरी हे वरिष्ठ नेते अनेक नेत्यांना आवडत नसतानाही काँग्रेसचे अध्यक्ष बनले.शरद पवार यांच्या पराभवाची अनेक कारणे सांगितली जातात ती म्हणजे पवार गांधी घराण्यापेक्षाही प्रभावी होतील म्हणून सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करत केसरींना ताकत दिली. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील नेत्यांनी त्यांना अंधारात ठेवलं. महाराष्ट्रातील नेत्यांनी पण साथ दिली नाही. त्यामुळे पवारांचा पराभव झाला.

GIF Advt

सीताराम केसरी अध्यक्ष झाल्यानंतर १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला त्यामुळे केसरी यांना अध्यक्षपदावरून दुर करण्यात आले. आणि सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या त्या तब्बल १७ वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या.पण शरद पवार हे अध्यक्षपदाच्या निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर त्यांचे सोनिया गांधी यांच्याशी खटके उडू लागले. पवारांसह काही वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी विदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित केला आणि काँग्रेसला रामराम ठोकला. पुढे पवारांनी १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना केली पण त्याच काँग्रेससोबत जुळवून घेतल आणि राज्याबरोबरच केंद्रातही सत्तेत राहिले. जर त्यावेळी पवार काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते तर काँग्रेसची आज ही अवस्था झाली नसती आणि पवार देखील एक कर्तृत्ववान पीएम म्हणून इतिहासात नोंदले गेले असते. असे अनेक राजकीय जाणकार सांगत असतात. त्यामुळे राहुल बजाज यांनी त्यांना न लाभलेले पंतप्रधान असा उल्लेख केला होता. पण या जर तर च्या गोष्टीत आहेत. पण संविधानिक निवडणूकीत एकही निवडणूक न भरलेले शरद पवार पक्षातील निवडून मात्र हरले होते.

सध्या काँग्रेसची अवस्था फारच बिकट असून २३ वर्षांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. १७ ऑक्‍टोबरला यासाठी मतदान होणार आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर हे आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जर या दोन नेत्यांमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर कॉंग्रेसला तब्बल २४ वर्षांनंतर बिगरगांधी घराण्याचा अध्यक्ष मिळणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!