Latest Marathi News

‘तिने पप्पा म्हणून…’वडिलांच्या हाकेनंतर गौतमी भेटायला जाणार का..?बघा सविस्तर बातमी

डान्सर गौतमी पाटीलची रोज काही ना काही चर्चा सुरुच आहे. आधी अश्लील डान्स, मग माफी, कार्यक्रमात होणारा राडा अशा अनेक कारणांनी तिची चर्चा रंगलेली असते.

आता तर तिच्या आडनावावरुनही आक्षेप घेतला जातोय. मात्र तिचं आडनाव पाटील आहे तर ती तेच लावणार ना अशी प्रतिक्रिया गौतमीच्या वडिलांनी दिली आहे. त्यामुळे आता गौतमीसोबतच तिचे वडीलही चर्चेत आलेत. पण गौतमीचा तिच्या वडिलांशी कोणताही संपर्क नाही यामागची कहाणी तिने एका मुलाखतीत सांगितली होती. मग आता गौतमी वडिलांना भेटायला जाणार का असा प्रश्न तिला विचारला असता तिने काय उत्तर दिलं बघा.

मध्यंतरी गौतमीने तिच्या आणि आईच्या संघर्षपूर्ण आयुष्याचा खुलासा केला होता. गौतमीचे वडील दारुच्या व्यसनामुळे तिच्या आईला मारहाण करायचे म्हणून तिच्या आईच्या माहेरच्यांनी त्यांना वडिलांना दूर जाण्यास सांगितले होते. गौतमी आईसोबत तिच्या मामाच्या घरी येऊन राहिली. उभ्या आयुष्यात ती वडिलांना जास्त भेटली नव्हती.

आता गौतमीला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून तिचे वडिलही माध्यमांसमोर आले आहेत. मग गौतमी वडिलांना भेटायला जाणार का या प्रश्नावर ती म्हणाली, “मी इथपर्यंत कशी आलीए हे मी तुम्हाला सांगितलं होतं. हा कौटुंबिक प्रश्न आहे त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. मी एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. माझ्या मागे माझी आई आहे. मी यावर नाही बोलू शकत. कौटुंबिक वाद असल्याने तो इथे आणू इच्छित नाही.”

गौतमीच्या वडिलांनी काढली लेकीची आठवण

गौतमीचे वडील रवींद्र नेरपगारे म्हणाले, “गौतमीने तिच्या अंगी असलेल्या कलेच्या जोरावर स्वतःचं नाव मोठं केलंय. त्याचा अभिमान आहे. तिच्याकडून मला पैशांची अपेक्षा नाही, पण तिने बाप म्हणून आपल्याला स्वीकारावं, अशी अपेक्षा आहे. तिचं आडनाव पाटील आहे तर ती पाटीलच लावणार. यात काय चुकीचं आहे.”

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!