Latest Marathi News

व्हिडिओ व्हायरल झाला शीतल म्हात्रेचा चर्चेत आली उर्फी जावेद

उर्फी जावेद म्हणते, हिपोक्रॅसीचीही काही सीमा असते...,कोणाला इशारा

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवरुन राजकारण जोरात चालू आहे. त्यावर अनेकजण आपले मत मांडत आहेत सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली आहे. पण या वादात अनपेक्षितपणे उर्फी जावेदची एंट्री झाली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रे यांना पाठिंबा देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, चित्रा वाघ यांच्या या भूमिकेवरून उर्फी जावेद हिने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उर्फी म्हणाली की, ‘ती वेळ विसरलात का? जेव्हा माझ्या कपड्यांमुळे, माझ्या चारित्र्यावर बोट दाखवलं होतं. यावरूनच मला तुरुंगात पाठवण्याची मागणी देखील केली होती. इतकंच नाही, तर माझं डोकं फोडण्याची उघड धमकीही देण्यात आली. वाह वाह वाह. हिपोक्रसीच्या पण काहीतरी मर्यादा असतात, हे कोणी तरी या बाईला सांगा.’ असा टोला लगावला आहे. मध्यंतरी उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वाद चांगलाच पेटला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रहार करण्यात आले होते. तत्पूर्वी चित्ता वाघ यांनी शीतल पुरता मर्यादीत नाहीचं, राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. @MumbaiPolice ना आवाहन आहे, या हरामखोरांना सोडू नकाचं. पण यांचा करविता धनी कोण आहे, त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा.’ अशा शब्दात समर्थन दिले होते. पण आता उर्फीच्या एन्ट्रीने कहानीत ट्विस्ट आला आहे.

शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओत अशोभनीय बदल करून तो सोशल माध्यमातून अपलोड केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातली एक आरोप ठाकरे गटाशी संबंधित आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्री देसाई म्हणाले, आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!