Latest Marathi News
Ganesh J GIF

किशोर आवारे खून प्रकरणात नाव आल्यानंतर शेळके मिडीयासमोर

आवारेंच्या हत्येप्रकरणी सुनील शेळके यांचे स्पष्टीकरण, म्हणाले आमच्या मतभेद पण...

पुणे दि १३(प्रतिनिधी)- तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. आवारे यांच्या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता असं आवारे यांच्या आईने आरोप केला होता. पण आता आमदार शेळके यांनी पत्रकार परिषद घेत भुमिका जाहिर केली आहे.

पत्रकार परिषद घेत आमदार सुनील शेळके म्हणाले की, किशोर आवारे आणि माझ्यात मतभेत जरूर होता परंतु आमच्यात मनभेद नव्हता. कृपया किशोर आवारेंच्या खुनाचे कोणी राजकारणकरू नये. जे कोणी खुनी असेल त्याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. माझ्या आणि माझ्या भावा विरोधात खोटी तक्रार आवारेंच्या कुटुंबीयांनी दिली आहे, मी त्यांचा संताप समजू शकतो परंतु हा मला जाणीव पूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांनी माझी खुशाल चौकशी करावी, पण माझी बदनामी करणाऱ्यांचीही ती करण्याची मागणी त्यांनी केली. गुन्ह्यातील सत्य पोलिस पुढे आणतील, आपल्या या बदनामीमागे कोण आहेत, त्यांना पुढे आणणार असल्याचेही आमदार सुनिल शेळके म्हणाले आहेत. किशोर आवारे यांच्या खूनाचा तीव्र निषेध आमदार सुनिल शेळके यांनी सुरुवातीसच केला. तसेच त्यांच्या खून्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली. या घटनेने मावळातील राजकारणात वाईट पायंडा पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजच व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही यासंदर्भात भेट घेणार असल्याचे शेळके यांनी सांगितले आहे. दरम्यान कालची घटना झाली त्या घटनेनंतर आज सकाळी सात वाजता सुनील शेळके नोटरीचेबल, फोन स्विच ऑफ अशा पद्धतीने माध्यमाने ज्या काही बातम्या लावण्याचे काम केलं त्या अनुषंगाने आत्ता मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे. असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. यानंतर या घटनेला वेगळे वळण मिळत आहे. आमदार सुनील शेळकेसह सात जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या माघून कोणी जर राजकारण करत असेल तर त्यांची पण चौकशी पोलिसांनी केली पाहिजे असे सुनील शेळके म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!