Latest Marathi News
Ganesh J GIF

कर्नाटकात काँग्रेसची विजयासह सत्तेला गवसणी

भाजपाचा दणदणीत पराभव, हनुमानाचा प्रचार भाजपालाच भारी, काँग्रेसला सत्तेचा बुस्टर

बेंगलोर दि १३(प्रतिनिधी)- कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला असुन काँग्रेसने भाजपाचा सुपडा साफ करत एकहाती बहुमत घेत विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपाचे सलग दुस-यांदा विजय मिळवण्याचे स्वप्न साखर झाले आहे. पण निवडणुकीच्या निकालनंतरही काँग्रेस पूर्णपणे सावध आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत एकहाती बहुमत मिळवले आहे. काँग्रेसने शेवटचा कल हाती आला तेंव्हा ११३ जागा जिंकत बहुमत मिळवले असुन २३ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. एकुण १३६ जागा काँग्रेसने हस्तगत केल्या आहेत. तर भाजपाची पिछेहाट झाली असुन भाजपाने ५३ जागांवर विजय मिळवला आहे तर इतर ११ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. किंगमेकरचा दावा करणाऱ्या जेडीएसने १० जागांवर विजय मिळवला आहे तर १० जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर इतर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. भाजपाने हनुमानाचा निवडणूकीसाठी केलेला वापर कर्नाटक मतदारांच्या पसंतीस पडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती राहिल असे अंदाज व्यक्त करत भाजपने जेडीएस नेत्यांशी संपर्क साधला होता पण त्यांचा अंदाज धुळीस मिळाला आहे. भाजपाला यंदा निवडणूकीत ४० जागा कमी आल्या आहेत.

एकहाती बहुमत मिळणून देखील काँग्रेस सतर्क असून कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे. विधीमंडळ नेत्याची निवड उद्याच जाहीर होणार असून डी. के शिवकुमार व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यापैकी एकाची मुख्यमंत्री पदासाठी निवड होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!