Latest Marathi News
Ganesh J GIF

दिशा सलियन प्रकरणात शिंदे आणि अजितदादाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या पाठीशी

महायुतीत फूट, भाजपा एकाकी, म्हणाले आदित्य ठाकरेंचा काहीच संबंध नाही कारण..

मुंबई – दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबईत २०२० साली दिशा सालियनचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता.

दिशाच्या हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव आल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सत्ताधारी नेत्यांनी या प्रकरणामध्ये नाव येणाऱ्या आदित्य ठाकरे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकारी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मात्र आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. दिशा सालियानच्या प्रकरणात सीआयडी तपास करण्यात आला. मात्र यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचा समावेश नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करतोय असे नाही मी जे सत्य आहे ते सांगतो आहे. हे सत्य तपासामध्ये समोर आलं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील दिशा सालियान प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिली. त्यांनी देखील आदित्य ठाकरेंची बाजू घेत यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीमधील भाजपचे मित्रपक्ष हे आदित्य ठाकरेंची बाजू घेत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपा दिशा सलियन प्रकरणात एकटे पडल्याचे चित्र आहे. दरम्यान दिशा सालियन प्रकरण हे पुन्हा एकदा चार वर्षानंतर प्रकाशझोतात आले आहे. यामध्ये तिच्या बलात्कार केल्याचा आरोप तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे, त्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर कोर्टात लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. सध्यातरी आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळले असले तरी, तपास यंत्रणांकडून यावर पुढील कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!