Latest Marathi News
Ganesh J GIF

‘सरपंच तुला बघून घेऊ.. तुला जिवंत सोडणार नाही’

सुदर्शन घुलेनेच दिली होती संतोष देशमुख यांना धमकी, 'या' महत्वाच्या साक्षीदारांचा जवाब

बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आवादा एनर्जी प्रकल्पावर तैनात असलेल्या तीन वॉचमनच्या जबाबामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे कराड आणि गँगच्या अडचणी वाढणार आहेत.

वाॅचमनने दिलेल्या जबाबानुसार, सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी प्रकल्प व्यवस्थापकाकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी सरपंच देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे हे तिघे आवादा एनर्जी प्रकल्पात वॉचमन म्हणून कार्यरत होते. एका रात्री सुदर्शन घुले आपल्या साथीदारांसह प्रकल्पात आला. यावेळी त्याने तिन्ही वॉचमनना मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेनंतर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आवादा एनर्जी प्रकल्पाचे व्यवस्थापक शिवाजी थोपटे यांच्याकडे घुले याने २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास कंपनी बंद करण्याची धमकीही देण्यात आली होती. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कामगारांचे रोजगार टिकून राहावेत म्हणून सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे घुले संतापला होता. होते.कंपनी बंद करू नका,लोकांना रोजगार मिळू द्या असे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना सरपंच देशमुख म्हणत होते. त्यावेळी सुदर्शन घुलेने सरपंच देशमुख यांना सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही.’अशी धमकी दिली असा जबाब वॉचमनने दिला आहे. त्यामुळे आता घुले आणि साथीदार अडचणीत आले आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन खटल्याची सुनावणी बीडच्या न्यायालयाच होणार आहे. सरकारी पक्ष व आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाने केलेली मागणी मान्य केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!