
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर करण्यात आला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तार झाल्यानंतर नव्या सरकारचे संभाव्य खातेवाटप कस असेल अशी चर्चा सुरू झाली होती अखेर ते खातेवाटप कसे असेल हे समोर आले आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपाने महत्वाची खाती स्वतःकडे ठेवत आपले वर्चस्व राहील याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.
पाहूया कोणाला कोणते खाते मिळणार?
भाजपकडून संभाव्य खातेवाटप
देवेंद्र फडणवीस – गृह आणि अर्थ मंत्रालय
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल आणि सहकार मंत्रालय
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा आणि वन मंत्रालय
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम मंत्रालय
विजयकुमार गावित – आदिवासी विकास मंत्रालय
गिरीश महाजन – जलसंपदा मंत्रालय
सुरेश खाडे – सामाजिक न्याय मंत्रालय
रवींद्र चव्हाण – गृहनिर्माण मंत्रालय
अतुल सावे – आरोग्य मंत्रालय
मंगलप्रभात लोढा – विधी, न्याय मंत्रालय
शिंदे गटाकडून संभाव्य खातेवाटप
एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्रालय
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा मंत्रालय
दादा भुसे – कृषी मंत्रालय
संजय राठोड – ग्रामविकास मंत्रालय
संदिपान भुमरे – रोजगार हमी योजना मंत्रालय
उदय सामंत – उद्योग मंत्रालय
तानाजी सावंत – उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास मंत्रालय
दीपक केसरकर – पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालय
शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क