महाराष्ट्राच्या राजकारणात बाप मंत्री लेक खासदारच्या तीन जोड्या
राज्याच्या हटके राजकारणाची रंजक कहाणी
मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात शिंदे सरकारचा शपथविधी आज पार पडला. नव्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील आणि विजयकुमार गावित यांनीदेखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता राज्याच्या राजकारणात वडील मंत्री आणि मुलगा खासदार अशा तीन जोड्या झाल्या आहेत. पण यामुळे भाजपातही घराणेशाही असल्याचे दिसून आले आहे.
यातील पहिली जोडी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे भाजपाच्या साथीने थेट मुख्यमंत्री झाले तर त्यांचा मुलगा श्रीकांत सध्या खासदार आहे. श्रीकांत शिंदे कल्याण मधून दुस-यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत.

दुसरी जोडी आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील.राधाकृष्ण विखे गेल्या निवडणुकीत भाजपमध्ये दाखल झाले. अल्पावधीतच त्यांनी भाजपच्या राज्य ते देश पातळीपर्यंतच्या नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यांचे चिरंजीव भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे अहमदनगरहून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत.
भाजपाचे विजयकुमार गावित यांनाही नव्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी आहे. तर त्यांची कन्या हीना गावीत नंदूरबारमधून खासदार आहेत.
भाजप वारंवार विरोधी पक्षावर घराणेशाहीवर टिका करत असते. पण या विस्तारात भाजपला घराणेशाहीचे वावडे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विरोधी पक्षही आता भाजपाला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.