Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

न्यायालयाच्या निकालानंतर विस्ताराला मुहूर्त सापडला, हे १९ जण घेणार मंत्रीपदाची शपथ

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाने शिंदे सरकार सत्तेवर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला असुन निकालामुळे थांबलेला विस्तार लवकरच केला जाणार आहे. मंत्रिमंडळात कोणाचे किती मंत्री शपथ घेणार हे निश्चित झाले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अकरा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहणार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार आता लवकरच रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. या विस्तारात भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ७ मंत्री शपथ घेतील तसेच दोन अपक्षांनाही संधी दिली जाणार आहे. यावेळी मंत्र्यांच्या खात्यांचाही फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे. तसेच होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात १९ जणांचा शपथविधी होणार आहे. आता मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालामुळं शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. पण आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. शिंदे सरकार स्थिर असून, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे, असे स्पष्ट झाले आहे.

बहुमताच्या सरकारवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. घटनाबाह्य, बेकायदेशीर असे म्हणून काही जण पाठ थोपटून घेत होते. मात्र कोर्टाने घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चपराक दिली आहे. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!