धक्कादायक! बैठकीत भाजपच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या
हल्ल्याच्या घटनेने राज्यात खळबळ, कुऱ्हाडीने वार करत शरीराचे तुकडे, राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर भाजपाची टिका
रायपूर दि ४(प्रतिनिधी)- देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या एका नेत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी नारायणपूर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी भाजप नेते रतन दुबे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
नक्षलवाद्यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची हत्या केली आहे. रतन दुबे हे नारायणपूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष होते. तसेच ते मालवाहन परिवहन संघाचे जिल्हाध्यक्षदेखील होते. ते कौशलनगर बाजार या परिसरात भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. ते कौशलनगर बाजार या परिसरात भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. तिथून परतत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. छत्तीसगडच्या बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे. तसंच हत्येत नक्षलवाद्यांचा हात आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल, असं पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज म्हणाले आहेत.राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. त्यामुळे माझं सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, या सर्व बाबींचा सामना करत आपण निवडणुकीत ठामपणे उभे राहू आणि निवडून येऊ आणि येत्या काळात नक्षलवाद्यांची समस्या समूळ नष्ट करू अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये नुकतीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा पार पडल्या होत्या. दरम्यान आगामी काळात निवडणूक प्रचारात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी येणार आहे.
सध्या देशात छत्तीसगडसह एकूण पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सध्या या राज्यात काँग्रेसची एकहाती सत्ता आहे.