बाॅलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री साऊथ स्टारबरोबर करणार लग्न?
साऊथच्या स्टार अभिनेत्यासोबत हैद्राबादला होणार शिफ्ट?, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा म्हणाली आपल्या व्यक्तीशी लग्न....
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने बी-टाऊनमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पण आता मृणाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मृणाल दाक्षिणात्य अभिनेत्यासोबतच्या लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
मृणाल लवकरच लग्न करणार आहे अशा चर्चांना उधाण आले आहे. मृणाल एका तेलुगू अभिनेत्याच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून रंगली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात, ज्येष्ठ चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनी मृणालला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला. त्याचसोबत त्यांनी मृणालला लग्नासाठीदेखील आशिर्वाद दिले. तेव्हापासूनच मृणालच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. पुरस्कार सोहळ्यात लग्नाचे आशीर्वाद देताना अरविंद म्हणाला होता, “मृणालने हैदराबादमध्ये स्थायिक व्हावे अशी माझी इच्छा आहे.” त्याचवेळी मृणालने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल बोलले होते. ती म्हणाली होती, “माझा लग्नावर विश्वास आहे. माझ्या आजूबाजूला अनेक यशस्वी विवाह आहेत. ते एकमेकांसाठी बनलेले आहेत. कधीकधी, आपल्याला असे वाटते की आपण आपल्यासाठी असलेल्या व्यक्तीशी लग्न केले पाहिजे.” या दोन वक्तव्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा रांगली होती.मृणाल ठाकूरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यात मृणालने सांगितले की त्यांच्या लग्नाच्या अफवा खूपच गमतीशीर आहेत. तिने लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले आणि चाहत्यांना तिच्यासाठी चांगले वर शोधण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर दुसरे म्हणजे मला माफ करा. ही खोटी अफवा आहे कारण मला फक्त आशीर्वाद मिळत आहेत. हे इतके मजेदार आहे की ही अफवा आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. पण एवढं सांगू शकते की लग्न लवकरच होणार आहे. असेही मृणाल आपल्या व्हिडिओत म्हणाली आहे.
कुमकुम भाग्यपासून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या मृणालने त्यानंतर ‘जर्सी’, ‘लस्ट स्टोरीज २’, ‘लव्ह सोनिया’, ‘सुपर 30’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, ‘सीता रामम’ चित्रपटातील ‘राजकुमारी नूरजहाँ’ आणि ‘सीता’ या तिच्या भूमिकांनी तिला वेगळ्याच पातळीवर ओळख मिळवून दिली. यासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.