Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! पुण्यात धमकी देत पोलिस हवालदाराचा महिलेवर बलात्कार

पोलीस हवालदाराचीही महिलेविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार, नेमके प्रकरण काय?

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत शहर पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हवालदारानेही आरोप करणाऱ्या महिलेविरोधात धमकीची तक्रार दाखल केली आहे.

राहुल अशोक मद्देल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. मद्देल हडपसर पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वडगाव शेरी भागातील शिवराणा प्रताप पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. तिथे तिची पोलिस हवालदार मद्देल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने मुलगा आणि पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले, तसेच तिच्याकडून त्याने वेळोवेळी पैसे उकळले. असा आरोप महिलेने केला आहे. यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मद्देल याने पीडित महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. एवढेच नाही तर मद्देल याने महिला, तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध खंडणी उकळल्याची फिर्याद दिली आहे. महिलेने ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर घर खरेदी तसेच अन्य कारणांसाठी वेळोवेळी दोन लाख ३५ हजार रुपये घेतले. पैसे परत मागितल्यानंतर महिलेने बलात्कार केल्याची खोटी तक्रार दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले, असे पोलिस हवालदार राहुल मद्देल याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

हा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते ८ डिसेबर २०२१ दरम्यान घडला आहे. हवालदार मद्देल हे पुर्वी २०१५ ते २०२० चंदननगर पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. महिलेच्या तक्रारीचा तपास उपनिरीक्षक मुळुक करत आहेत. तर मुद्दल यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!