धक्कादायक! बाॅलीवूडच्या फेमस अभिनेत्रीचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्रीला दाखवले आक्षेपार्ह अवस्थेत, अभिनेत्री ठरत आहेत डिपफेक व्हिडिओचे शिकार, डीपफेक व्हिडीओचा विळखा
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आजचा जमाना माहिती तंत्रज्ञानाचा आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सुकर झाली आहेत. पण या माहिती तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर देखील होत आहे. यामुळे अनेकांना याचा फटका देखील बसत आहे. डिपफेक देखील असेच एक तंत्रज्ञान आहे. याचा अनेक अभिनेत्रींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बॉलिवूड अभिनेत्रींना डिपफेक व्हिडीओंचा धोका वाढत चालला आहे. आता अभिनेत्री क्रिती सेनॉनचेही व्हिडीओ समोर आला आहे.
बॉलिवूडची सध्याची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री क्रीती सेनॉनचा डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओंमध्ये अभिनेत्रींना अश्लील स्थितीत दाखवण्यात आले आहे. मुळ व्हिडिओमधील मॉडेल वेगळी असून तिच्या चेहेऱ्याच्या जागी क्रितीचा चेहेरा लावण्यात आला आहे. हा व्हिडीओ खोटा आहे हे कळून येत असलं तरी बऱ्याच लोकांचा काही क्षणापुरता गोंधळ होत आहे. क्रितीचा हा व्हिडिओ ‘kritisanon.ilyy’ या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या खाली बऱ्याच लोकांनी कॉमेंटमध्ये हा व्हिडीओ रिपोर्ट करायची विनंती केली आहे. क्रीतीच्या व्हायरल होणाऱ्या या डीपफेक व्हिडीओमुळे मात्र सायबर सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सेलिब्रिटीजच्या चेहऱ्याचा असा होणारा गैरवापर पाहून बऱ्याच लोकांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन अधिक सुकर झालं असलं तरी यामुळे बऱ्याच प्रमाणात धोकादेखील निर्माण झाला आहे. खासकरून सेलिब्रिटीजसाठी हा खूप मोठा धोका आहे. कारण रश्मिकापाठोपाठ काजोलचाही असाच डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. काहीच दिवसांपूर्वी आलिया भट्टच्या डीपफेक व्हिडीओची खूप चर्चा झाली होती.
रश्मिका मंदानाच्या व्हिडीओप्रकरणी नुकतंच दिल्ली पोलिसांनी बिहारमधून १९ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता लवकरच आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनच्या या व्हिडीओ प्रकरणावरही त्वरित कारवाई होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे सारा तेंडुलकर, शुभमन गील, कतरिना कैफ यांचेदेखील असेच फोटो आणि व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाले होते.