
करवाचौथच्या दिवशीच या पतिपत्नीसोबत घडला धक्कादायक प्रकार
कारण शोधताना पोलिसही चकित, परिसरात उडाली खळबळ
इंदूर दि १५(प्रतिनिधी)- करवाचोैथचे व्रत पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवत असते. पण मध्यप्रदेशमध्ये करवा चोथच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. इंदूरमधील परदेशीपुरा भागात करवा चौथच्या दिवशी एका महिलेने आत्महत्या केली.पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही विष प्राशन करुन आत्महत्या केली. दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इंदूरमधील परदेशीपुरा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील सोनू नावाच्या महिलेला करवा चाैथच्या दिवशीच गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी मिळताच पती शेखरनेही विष प्राशन केले. पण त्याचाही रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण दोघांनीही आत्महत्या का केली याचे कारण गुलदस्त्याच राहिल्यामुळे पोलीसांसमोर तपासाचे मोठे आव्हान असणार आहे.पोलिसांनी त्यांचा जबाब घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. आता कुटुंबीयांचे जबाब घेणार असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. त्यानंतरच त्यांनी असे पाऊल का उचलले हे समजणार आहे.
पोलीसांनी दोन्ही मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक तपशील तपासत आपला तपास सुरु केला आहे. पण कुटुंबीयांनी मात्र घरात कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचा दावा केला आहे.शवविच्छेदन अहवाल आणि मृतदेहाचा तांत्रिक अहवाल आल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे.