
पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादाक बातमी समोर येत आहे. आपलं अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देऊन आपल्याला मारहाण केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे केली. तसेच सासरच्यांनी आपलं अपहरण करत असल्याचा सीसीटीव्ही फूटेजदेखील घेऊन गेलो तरी देखील वाकड पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला आहे.
महिलेच्या छळवणूक प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास ती तत्काळ दाखल करण्याचे गृहविभागाचे आदेश असताना देखील,वाकड पोलीस एवढ्या गंभीर प्रकरणाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करतायत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी पोलीस आता काय-काय तपास करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान, संबधित प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना विचारलं असता, त्यांनी आपण इतर ठिकाणी बंदोबस्तात असल्याने तक्रार घेण्यास थोडा विलंब झाल्याचे सांगितलं. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व तांत्रिक बाबी तपासून तक्रारी नुसार गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याची शक्ता आहे. या घटनेत पीडित महिलेला एक महिला आणि दोन पुरुष हे सरपटत खेचून रस्त्यावर आणत आहेत. या दरम्यान एक चारचाकी त्यांच्याकडे आणली जाते. या चारचाकीत पीडितेला जबदस्ती टाकलं जातं. पीडिता त्यांचा प्रचंड प्रतिकार करते. पण इतर तिघांसमोर तिची शक्ती कमी पडते. त्यामुळे पीडिताला गाडीत जबरदस्ती बसवलं जातं आणि गाडीचा दरवाजा बंद करण्यात येतो. सीसीटीव्हीच्या माहितीनुसार, ही घटना 19 जूनला दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.