
पुण्यातील या गावाचा कारभार पाहणार बहिण भावाची जोडी
बहीण सरपंच तर भाऊ उपसरपंच, भुकुमच्या गावकऱ्यांनी घडवला इतिहास, जोरदार चर्चा
पुणे दि २३(प्रतिनिधी)- राजकारणामुळे नात्यात दुरावा आल्याचे अनेक प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. पण पुणे जिल्ह्यात एक अनोखा योगायोग पहायला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ पाहणार आहे. या योगायोगाची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे.
मुळशीच्या भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची निवड झाली आहे. आता बहिण भावाची जोडी गावचा कारभार पाहणार आहे. विशेष म्हणजे सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची निवड आधीच करण्यात आली होती. मयुरी आमले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी मयुरी अभिलाष आमले यांना सरपंच म्हणून घोषित केले. त्यानंतर निर्वाचित सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला. युवा सरंपच झालेल्या मयुरी आमले गावाच्या विकासासाठी मोठा बदल करणार आहेत. यामुळेच गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांची बिनविरोध निवड केली आहे. आमले यांच्या रुपाने भुकुममध्ये महिला राज असणार आहे. सध्या या दुर्मिळ योगायोगाची जोरदार चर्चा होत आहे.
अगोदरच्या सरपंच गौरी प्रसाद भरतवंश यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिकामे झाले होते. भुकूम गावच्या इतिहासात पहिल्यांदा ही निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. गावचा कारभार महिलेच्या हाती आल्याने याचा गावच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.