
…म्हणून चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावला माईक
मुख्यमंत्र्यांची ती कृती कॅमेऱ्यात कैद, अनेकांनी व्यक्त केली नाराजी, कार्यक्रमात नेमके काय घडले?
जयपूर दि ४(प्रतिनिधी)- देशात लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून विविध दाैरे आयोजित केले जात आहेत. पण या दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माईक भिरकावल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या कृतीची जोरदार चर्चा होत आहे.
राजमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्यामुळे सत्ताधारी नेते विविध ठिकाणी जात सरकारच्या योजनांची माहिती देत आहेत. त्या अंतर्गतच मुख्यमंत्री गेहलोत महिलांना सरकारी योजनांची माहिती देत होते. तेवढ्यात त्यांचा माईक बंद पडला. माईक बंद पडल्याने अशोक गेहलोत चांगलेच चिडले. यानंतर अशोक गेहलोत चांगलेच चिडले आणि त्यांनी तो माईक जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावला. गेहलोत यांच्या या कृतीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात गेहलोत पोलीस अधीक्षकांवर देखील चिडलेले पहायला मिळाले. दरम्यान महिलांसाठी ज्या सरकारी योजना चालवल्या जातात त्याचा फिडबॅक घेण्याच्या दृष्टीने ते महिलांच्या एका समूहाशी संवाद साधत होते, त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
Ashok Gehlot gets angry and throws Mike(not working) at an official pic.twitter.com/fa3d5Ea4h1
— Hemir Desai (@hemirdesai) June 3, 2023
दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट येत्या काही दिवसात राजस्थानच्या राजकारणात मोठा भूंकप करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याचे चित्र आहे. पायलट हे पुन्हा एकदा गहलोत यांच्यापासून नाराज असल्याचे बोलले जात आहे.