पुण्यातील साळुंके विहार परिसरातील गॅस पाईपलाईनला आग
कार जळून खाक, परिसरातील गॅस आणि वीज पुरवठा बंद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यातील सांळुके विहार परिसरात गॅस पाईपलाईनला मोठी आग लागली होती. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेडच्या गॅस पाईपलाईनला नाला पार्क जवळील साळुंके विहार येथे भीषण लागली होती. यात एक कार जळून खाक झाली.
साळुंके विहार परिसरात आग अत्यंत वेगाने पसरल्याने परिसरातील नागरिक आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाच्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याचे समजताच एमजीएनलची एक तुकडी आणि अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या आगीमुळे एक गाडी जळून खाक झाली. खबरदारीचा उपाय म्हणून गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून, सांळुके विहार परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीमुळे आजूबाजूच्या परिसराला देखील मोठा धोका निर्माण झाला होता. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीचा व्हिडिओ समोर आला असून त्यातून त्याची दाहकता दिसून येत आहे.
पुणे शहरात आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. कालच येवलेवाडीत एका गोडावूनला आग लागली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त नुकसान झाले होते. एैन पावसाळ्यात आगीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.