बसमध्ये जागा मिळविण्यासाठी अपंग व्यक्तीने केले असे काही
अपंग व्यक्तीचा तो व्हिडिओ जोरदार व्हायरल, काय केले अपंगाने एकदा बघाच
ओैरंगाबाद दि २(प्रतिनिधी)- बसमध्ये जागा मिळवण्यासाठी अनेकजण अनेक नामी कल्पना शोधून काढत असतात. त्याचे व्हिडिओही जोरदार व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मिडीयावर ओैरंगाबादमधील एका अपंग व्यक्तीचा बस मध्ये जागा मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
स्थानकावर बस आल्यानंतर या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात यात अपंग सुद्धा आघाडीवर आहेत. औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर औरंगाबाद पैठण बसमध्ये जागा मिळवण्यासाठी एक अपंग व्यक्ती चक्क बसच्या खिडकीतून चढला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एक पाय अपंग आणि दोन कुबड्या संभाळत त्या अपंग व्यक्तीने अगदी सफाईदारपणे बसच्या खिडकीत उडी मारून जागा पटकावली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
महामंडळाच्या बसमध्ये महिला, जेष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींसाठी राखीव जागा असतात. परंतु, सध्या या राखीव जागा केवळ नावालाच असल्यासारखी स्थिती आहे. बहुतेक वेळा त्यांना उभा राहूनच प्रवास करावा लागतो. पण जागा मिळवण्यासाठी या अपंग व्यक्तीची धडपड अनेकांचे लक्ष वेधणारी ठरली आहे.