![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
महाराष्ट्राच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण
रायगड जिल्ह्यातील राहुल भगत शहीद, गावावर शोककळा
रायगड दि ३(प्रतिनिधी) – भारतीय सैन्यातील महाराष्ट्राच्या सुपुत्र जवानाला देशाचं रक्षण करताना वीरमरण आले आहे. जवान राहुल भगत यांना देशसेवा करताना वीरमरण आले आहे.जवान राहुल भगत जम्मूतील बारामुल्ला इथे सीमेचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आले. उरी तहसीलच्या बोनियार भागातील कॅम्पमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. राहुल भगत हे अवघ्या 26 वर्षांचे होते.
राहुल भगत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील इसाने कांबळे गावाचे रहिवासी होते. महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमीत्ताने देशभरात पाळण्यात येणार्या अहिंसा दिनीच राहूल भगत यांना पाकिस्तानी सैन्याशी लढताना विरगती प्राप्त झाली आहे. राहुल भगत यांच्या पश्चात आई वडील, भाऊ , पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. राहुल भगत यांचे कुटुंब ठाण्यात राहते तर आई वडील व भाऊ हे ईसान कांबळे गावात राहतात. शहिद राहूल भगत यांचे पार्थीव मंगळवारी त्यांच्या मुळ गावी म्हणजे ईसाने कांबळे येथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राहुल भगत यांचा जन्म १० मार्च १९९६ रोजी झाला होता. राहुल भगत वयाच्या १९ व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले होते. भगत कुटुंबिय हे मुळचे मु.पो.पिंपळदरी, ता.औढा नागनाथ, जि.हिंगोली इथले आहेत. मात्र भगत कुटुंबिय महाड या गावी सन १९८० पासून राहतात. त्यांचे निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.