राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण तथा उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी
खा. सुप्रिया सुळे यांची जलसक्ती मंत्र्यांशी चर्चा
दिल्ली दि १७ (प्रतिनिधी)- खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय जल अकादमी ही केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या जागेवर परिसरातील नागरीकांनाठी क्रीडांगण तथा उद्यान उभारले गेल्यास त्याचा नागरीकांना फायदा होऊ शकेल, असे त्यांनी शेखावत यांना सांगितले. खडकवासला आणि आसपासच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान तसेच एखादे मोठे उद्यान नाही. त्यामुळे जल अकादमीच्या मोठ्या जागेत हे प्रकल्प राबवता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघात ‘ ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कामांसाठी जलसक्ती मंत्रालयाने केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी शेखावत यांचे आभारही मानले.
Met with the Union Minister of Jal Shakti Hon. Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) ji and thanked him for the effective implementation of Jal Jeevan Mission Scheme in Baramati Loksabha Constituency. https://t.co/2P3TAKzg2d
— Supriya Sule (@supriya_sule) March 16, 2023