Latest Marathi News
Ganesh J GIF

विधानसभेसाठी भाजपा शिंदे गटाचे जागावाटप ठरले शिंदे गटाला अवघ्या ‘एवढ्या’ जागा

भाजप-शिंदे गटाचा जागावाटप फॉर्म्युला,एकनाथ शिंदेची अडचण भाजपाची सारवासारव

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटप निश्चित झाल्यानंतर शिंदे गट व भाजपानेही जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणूका युतीत लढण्याची घोषणा दोन्ही पक्षांनी आधीच केली आहे. आता दोन्ही पक्षात विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचे बोलले जात आहे. पण इथेच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा आहेत. अशात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. त्यासाठीचा हा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. चंद्रशेखर बावनकुळे भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की, “२०२४ मध्ये भाजपचे १५० ते १७० आमदार १०० टक्के निवडून येतील. आपण २४० च्या आसपास सी लढण्याच्या विचारात आहोत. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ५० पेक्षा जास्त आमदारच नाहीत. त्यामुळे आपण २४० जागा लढवल्या तर तेव्हा तुम्हाला खूप काम करावे लागेल.” असेही ते म्हणाले. पण शिंदे गटाला अवघ्या ४८ जागा देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हे जागावाटप निश्चित असल्यास एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. दरम्यान संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्याबाबत स्पष्टीकरण दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी केले होते. जागावाटप ठरले नसल्याचेही बावनकुळे म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!