Latest Marathi News
Ganesh J GIF

व्हॅलेंटाईन डे निमित्त महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीची खास पोस्ट

अभिनेत्रीने शेअर केलेल्या 'त्या' फोटोवर नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट, म्हणाली सिंगल....

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- व्हॅलेंटाईन डेनिमित्त अभिनेत्री प्राजक्ता अलिकडेच प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधले आहे. तसेच हे फोटो पाहून नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट पाहायला मिळत आहे.
दरम्यान प्राजक्ता माळी हिने सोशल मिडियावर फोटो शेअर केले आहे. अलिकडेच प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधले आहे. तसेच हे फोटो पाहून नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट पाहायला मिळत आहे.


प्राजक्ता कोणाला डेट करत आहे का? अशाही याआधी बऱ्याच चर्चा रंगल्या. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं होतं. चार वर्षांपूर्वी मी डेटला गेली असल्याचं तिने यावेळी सांगितलं. पण खरंच प्राजक्ता सिंगल आहे का? या प्रश्नाचं उत्तर प्राजक्ताने स्वतः दिलं आहे. अलिकडेच ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त प्राजक्ताने लाल रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करून म्हणाली, तुम्ही स्वतःचेच व्हॅलेंटाइन व्हा. हाच झोन पुढे सुरू राहील. अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य तुम्ही एकटे नाही मीही तुमच्यामध्ये सहभागी आहे अशी पोस्ट केली आहे. प्राजक्ताने व्हॅलेंटाईन डे रोजी आपले स्टेटस सिंगल आहे असे जाहिर केल्यानंतर नेटक-यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी ती सिंगल असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काहींनी आमच्या दुखात सहभागी झाल्याबद्दल आभार अशी कमेंट केली आहे. दरम्यान प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम व्यावसायिक देखील आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे.प्राजक्ताचे इन्स्टाग्रमावर १.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!