Latest Marathi News
Ganesh J GIF

मायलेकींनी व्हॅलेंटाईन डे दिवशीच रोडरोमिओला चोपला

चोप दिलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल, रोमिओला घडली जन्माची अद्दल

पालघर दि १४(प्रतिनिधी)- आज प्रेम दिवस पण काही महाभाग आजच्या दिवशी मुलींना नाहक त्रास देत असतात. पण पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यातील आचोळे रोड येथे मुलीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमियोला तरुणीने आणि तिच्या आईने भर रस्त्यात चोप दिला आहे.

आई आणि मुलीने रोमीओला दिलेल्या चोपचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. एक तरुणी बाजारात जात असताना एका तरुणाने तिची छेड काढली. ही घटना मुलीने आईला सांगितली. त्यानंतर दोघींनी त्या मुलाला रस्त्यात गाठत चांगलाच चोप दिला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या काळात ही घटना घडल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे. या घटनेची अद्यापतरी पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही. या परिसरात मुलींची रोजच छेड काढली जाते, अशा प्रकारची टवाळकी करणाऱ्या तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडलाय, अशी तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सगळीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र पोरींची येता-जाता छेड काढणाऱ्या रोडछाप रोमियोंची काही कमी नाही. काही मुली हा त्रास सहन करतात, पण काही मुली सहन न करता त्या रोड रोमियोला कायमची अद्दल घडवत असतात. दरम्यान या मारहाणीची जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!