Latest Marathi News
Ganesh J GIF

स्टार अभिनेत्रीला पीएनेच घातला तब्बल ७६ लाखांचा गंडा

बनावट सहीचा वापर करत केला मोठा कांड, अनेक दिवसापासून होती फरार, पैशातून आयफोन आणि बरच काही...

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची तब्बल ७६ लाखांची फसवणुक झाली आहे. विशेष म्हणजे ही फसवणुक तिची माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका प्रकाश शेट्टीनेच केल्याचे समोर आलं आहे. या बातमीमुळे बाॅलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका शेट्टीला आलिया भटच्या प्रोडक्शन हाऊस इटरनल सनशाइन प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच आलियाच्या पर्सनल अकाउंटवरून खोट्या सह्या करून पैसे काढण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेदिकांनी या दोन्ही खात्यातून तब्बल ७६ लाखांहून अधिक रक्कम अवैधरीत्या काढली. या बाबत आलियाची आई सोनी राजदान यांनी पाच महिन्या पूर्वीच तक्रार दाखल केली होती. २०२१ ते २०२४ पर्यंत आलियाची असिस्टंट म्हणून काम करणारी वेदिका शेट्टी डिसेंबर २०२३ मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या शिवसाई तेजा नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. त्यानंतर तिने व्हॉट्सअॅपद्वारे इटरनल सनशाइन प्रॉडक्शनशी संबंधित अनेक गोपनीय माहिती त्या व्यक्तीशी शेअर केली. वेदिकाने आलियाच्या खात्यातून अनेक लोक आणि कंपन्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर केल्याचंही तपासात समोर आलं आहे. ज्यामध्ये सात्विक साहूला ४३ लाख रुपये, सिमी जॉनच्या खात्यात ५७,०००, शशांक पांडेला ७७,०००, चांदणी जितेंद्र प्रसाद दीक्षितला १८ लाख आणि मनीष सुखीज नावाच्या व्यक्तीला ६ लाख रुपये पाठवण्यात आले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

‘एटरनल सनशाइन प्रोडक्शन’ आलिया भटने २०२१ मध्ये स्थापन केलं आहे. आलियाच्या या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट ‘डार्लिंग्स’ होता.जो शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत को-प्रोड्यूस केला होता. यामध्ये आलिया भट, विजय वर्मा आणि शेफाली शाहने महत्त्वाच्या भुमिका साकारल्या होत्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!