Latest Marathi News

स्टार गाैतमी पाटील लवकरच झळकणार ‘या’ वेब सीरिजमध्ये

सबसे कातील गाैतमी पाटीलचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित, तुम्ही म्हणाल...

पुणे दि १८(प्रतिनिधी)- आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीचा बोलबाला सगळीकडे सुरु आहे. सबसे कातील गाैतमी पाटील असा हेवा वाटणारा तिचा स्टारडम आहे.सौंदर्यासोबतचं डान्सने तिने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता हीच गौतमी पाटील गाणी आणि चित्रपटांसोबत वेब सीरीजमध्येही झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

गौतमीने स्वत: प्रसार माध्यमांशी बोलताना डिजिटल विश्वात पदार्पण करणार असल्याची माहिती दिली आहे. ती म्हणाली “सध्या माझे दोन-तीन गाणी आणि एक चित्रपट तसेच वेब सीरिज वगैरे चालू आहेत” पण कोणती गाणी वेब सिरिज आहे याची सविस्तर माहिती विचारल्यानंतर ते आत्ताच सांगता येणार नाही, तुम्ही पाहालच असे गाैतमीने सांगितेल आहे. स्टेजवर आपला जलवा दाखवणारी गाैतमी लवकरत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. तिचा घुंगरू नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ती वेब सिरिजमध्ये झळकणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


महाराष्ट्रात गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करत असतात. सुरूवातीला गौतमी अनेक ठिकाणी बॅक डान्सर म्हणून काम करायची. यावेळी गौतमीला फक्त ५०० ते १००० रूपये मिळायचे. पण आता प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली गाैतमी एका शोसाठी दीड ते दोन लाख रूपये घेते. तरीही तिच्या तारखा मिळणे अवघड आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!