Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार लाॅबिंग

भाजपमधून पाच नावं चर्चेत, काँग्रेसमध्ये दोघे इच्छुक, तर बिनविरोधाची शक्यता

पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. जो ही पोटनिवडणूक जिंकेल तोच २०२४ चाही खसदार होण्याची शक्यता असल्याने युती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पण भाजपात इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यावेळी महाविकास आघाडीत मोजकेचे नेते इच्छुक आहेत.

भाजपाकडून पुणे लोकसभेसाठी भाजपमधून सध्या गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे नावं चर्चेत आहेत. विशेष म्हणजे बापट यांच्या निधनानंतर दोन दिवसानंतर मुळीक यांचे भावी खासदार म्हणुन बॅनर झळकले होते. तर काँग्रेसमधून अरविंद शिंदे आणि मोहन जोशी या दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण कसब्याच्या पोट निवडणूकीत फटका बसल्यानंतर भाजप सावध खेळीकरत बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांना संधी देण्याची शक्यता आहे. स्वरदा बापट यांना राजकारणाचा अनुभव आहे. त्या लग्नाच्या आधी सांगली महानगर पालिकेच्या नगरसेविका होत्या. त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देखील त्यांनी बरेच वर्ष काम पाहीले आहे. त्यामुळे स्वरदा यांनाच उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करता जर भाजपाने बापट यांच्या व्यतिरिक्त दुस-या कोणालाही उमेदवारी दिल्यास ते ही आपला उमेदवार देणार आहेत पण बापट यांना उमेदवारी मिळाल्यास ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची देखील शक्यता अधिक आहे.

२०२४ च्या लोकसभा, विधानसभाच्या निवडणुकीच्या पूर्वी होणारी पुणे लोकसभेची ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. राज्यात, देशात निर्माण झालेली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत कशा पद्धतीने जनता सामोरी जाते याकडे सर्वांचाच लक्ष असणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!