Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीने बाॅलीवूडला ठोकला कायमचा रामराम

लग्नानंतर अभिनेत्रीचा मोठा निर्णय, मी आता गृहिणी राहणार म्हणत...

मुंबई दि २(प्रतिनिधी)- बाॅलीवूडच्या विश्वात झगमगाट असला तरी हे विश्व बेभरवशाचे देखील आहे. अभिनेत्री दलजीत काैरने दुसरे लग्न केल्यानंतर बाॅलीवूडला रामराम ठोकला आहे. आपण आता गृहिणी म्हणून राहू इच्छितो असे ती म्हणाली आहे.

दलजीत हिने यूके येथे राहणाऱ्या निखिल पटेल याच्यासोबत लग्न केलं आहे. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्री परदेशात शिफ्ट झाली आहे. सध्या अभिनेत्री पतीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दलजीत हिने दुसरं लग्न केल्यानंतर अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारलं, ‘लग्नानंतर गृहिणी राहशील की बाहेर काम करशील?’ यावर स्पष्ट उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘मला असं वाटतं मी गृहिणीच राहील….’ अभिनेत्रीच्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. करियरमध्ये या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी कष्ट केले आहे. करियर सोबतच घराकडे देखील लक्ष देईल कारण आता माझ्यावर आई, पत्नी, गृहिणी अशा अनेक जबाबदाऱ्या आहे आणि प्रत्येक जबाबदारी मला योग्य रित्या पार पाडायची आहे. विशेष म्हणजे दलजीत तीन मुलांची आई झाली आहे. कारण निखिल याला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत, तर दलजीत हिला देखील एक मुलगा आहे. सध्या दलजीत तिच्या नव्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.दलजीत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दरम्यान निखिल पटेलसोबत लग्न झाल्यापासून दलजीत कौर सतत बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत आहे.


दलजीत काैरने पहिलं लग्न ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झाले होते. पण काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २००९ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ६ वर्षांनंतर शालीन भनोटवर दलजीतने घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले. अखेर २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!