राणेपुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निषेध
तर राणे बंधूंना पळता भुई थोडी होइल, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
पुणे दि ८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अनुदार उद्गार काढणारे माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत राणेपुत्रांचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
राणे बंधू हे सातत्याने आदरणीय पवार साहेबांवर अतिशय खालच्या भाषेत वक्तव्ये करीत आहेत. लोकशाहीत विरोधकांना टिकेचा अधिकार दिला आहे. तो त्यांनी अवश्य वापरावा परंतु आपले वडील देखील ज्यांच्या पायावर नतमस्तक होतात त्यांच्यावर खालच्या भाषेत टिका करताना राणे बंधू यांनी किमान लाज बाळगावी अशी टिका यावेळी करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.राणे बंधू यांनी यापुर्वी अनेक वेळा मर्यादा सोडून वक्तव्ये केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता केवळ संसदीय लोकशाहीतील संस्कारामुळे शांत आहे परंतु जर तो भडकला तर राणे बंधूंना पळता भुई थोडी होइल असा इशारा पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी दिला आहे.
यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख, संतोष नांगरे , नितीन कदम , किशोर कांबळे , अमोल ननावरे , अजिंक्य पालकर , मृणालिणी वाणी , शशिकला कुंभार , सुशांत ढमढेरे , मंगेश जाघव ,संकेत शिंदे , प्रतिक कांबळे , बाळासाहेब अटल समिर पवार व पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.