बार्शी तालुक्यात विहरीत ऊडी घेत विवाहितेची दोन चिमुरड्यासह आत्महत्या
पाच वर्षापूर्वीच्या आत्महत्येची पुनरावृत्ती, बघा पोलीस नेमके काय म्हणाले
बार्शी दि १(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात एका विवाहितेने पोटच्या दोन चिमुरड्यांना घेऊन स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विशेष म्हणजे याच विहरीत पाच वर्षापूर्वी अशीच आत्महत्या करण्यात आली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसर कुसळंब गावात रोहिणी ऊर्फ अनुराधा बाबासाहेब काशीद, अनिष बाबासाहेब काशिद आणि अक्षरा बाबासाहेब काशीद अशा आत्महत्या केलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. विद्युत मोटारी लावून तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बाबासाहेब काशीद यांचा नोव्हेंबर २०१९ मध्ये अनुराधा सोबत दुसरा विवाह झाला होता.घटनेदिवशी घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी रोहिणीने दोन चिमुरड्यांना घेऊन उडी घेऊन आत्महत्या केली.योगायोग म्हणजे बाबासाहेब काशीद याची पहिली पत्नी अनुराधा हिने २७ जून २०१७ रोजी आदिती आणि अक्षरा या दोन मुलींना साडीने कंबरेभोवती बांधून याच विहीरीत उडी घेत आत्महत्या केली होती.लिंबराज प्रभाकर काशीद यांनी या घटनेची माहिती पोलीसांत दिली. घटना समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे शवविच्छेदन करण्यासाठी शव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते. अधिक तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.
दुर्देवी योगायोग असा की पहिल्या पत्नीचे नांवही अनुराधा होते तर मुलीचे नांवही अक्षरा होते. जाचहाट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेने कुसळंब गावावर शोककळा पसरली आहे.