Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे सरकारमधील हे मंत्री मराठी बिग बाॅसमध्ये सहभागी होणार?

बिग बाॅसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकरांनी नेत्यांची यादीच वाचून दाखवली

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सीझन इतर सिझनपेक्षा वेगळा ठरण्याची शक्यता आहे. शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी तसे संकेत दिले आहेत. यंदाच्या मराठी बिग बाॅसमध्ये शिंदे सरकारमधील मंत्री आणि काही आमदार सहभागी होण्याची शक्यता आहे. तसे संकेत देण्यात आले आहेत.

नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकरांना “राजकारणातील कोणती व्यक्ती बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर महेश मांजरेकरांनी खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे.ते म्हणाले, शिवसेना  खासदार संजय राऊत, भाजपा आमदार नितेश राणे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांची विनोदबुद्धी चांगली आहे. त्यामुळे त्यांनाही मला ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला आवडेल, असं मांजरेकर म्हणाले आहेत. त्यावर उत्तर देताना गुलाबराव पाटलांनीही ‘बिग बॉस’च्या घरात जाणं ही सोन्यासारखी संधी आहे. त्यामुळे अशी संधी मिळाली तर मी निश्चितच जाईन” असे म्हणत आपली इच्छा जाहीर केली आहे.त्यामुळे आमदार आणि मंत्री जनतेचे प्रश्न सोडून बिग बाॅस मध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बिग बाॅस हा शो कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतो. सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांप्रमाणेच राजकीय नेत्यांनाही ‘बिग बॉस’ने भुरळ पाडली आहे. त्यामुळे खरेच हे नेते बिग भागामध्ये सहभागी होणार का हे पहावे लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!