अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीला समन्स
आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, अभिनेत्रीवर गंभीर आरोप, बघा प्रकरण
वाराणसी दि १५(प्रतिनिधी)- भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. नुकतेच वाराणसी पोलिसांनी आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री अनुराधा सिंगला समन्स बजावले आहे. अनुराधा सिंह यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यामुळे भोजपुरी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
आकांक्षा दुबेने २६ मार्च २०२३ रोजी वाराणसीतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. यानंतर आकांक्षाच्या आईने हा खून असल्याचा दावा करत अनुराधा सिंगवर आरोप केले होते. आकांक्षाची आई मधु दुबे यांनी आकांक्षाच्या आत्महत्येनंतर लगेचच अनुराधा सिंहने तिचा मृतदेह जाळला, अंत्यसंस्कारानंतर तिने आकाक्षांचा मोबाईल सोबत ठेवला तसेच ज्यावेळी नातेवाईक आकांक्षा दुबेला फोन करत असताना ती कॉल डिस्कनेक्ट करत होती. अनुराधाने सर्व मोबाईल डेटा डिलीट केल्याचाही आरोप केला होता.
सुरुवातीला पोलीस अनुराधाविरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप देखील दुबे यांनी केला होता पण आता तिला पोलीसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. आकांक्षा दुबे प्रकरणाचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांच्या अर्जावरून वाराणसी पोलिसांनी अनुराधा सिंह यांना मुंबईतून समन्स बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आकांक्षा दुबे समर सिंगला डेट करत होती. त्यानेच तिच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता पण समर सिंगनं आकांक्षाच्या रिअल लाईफमधील दोन मुलांचा उल्लेख केला आहे. तो म्हणाला की आकांक्षा दुबे बनारस आणि मुंबई अशा ठिकाणच्या दोन मुलांच्या खूप जवळ होती असा दावा केला होता.