Latest Marathi News
Ganesh J GIF

देशातील टाॅप टेन खासदारांमध्ये सुप्रिया सुळेंचा डंका

लोकप्रिय खासदारांमध्ये सुप्रिया सुळे नंबर वन, यादीत महाराष्ट्राच्या खासदारांचा दबदबा

पुणे दि २४(प्रतिनिधी)- देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये महाराष्ट्राची बाजी मारली आहे. सतराव्या लोकसभेत आतापर्यंतच्या कामगिरीनुसार बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या नंबरवर आहेत. त्याचबरोबर या यादीमध्ये राज्यातील आणखी तीन खासदारांनी स्थान मिळवले आहे. या खासदारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळेंचा समावेश आहे.

‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे.देशातील खासदारांच्या संसदेतील कामगिरीवरून ही टॉप टेन खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील चार खासदारांचा समावेश आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या जास्त खासदारांचा या यादीमध्ये समावेश आहे. यातील महाराष्ट्रातील महिला खासदार असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच संसदेत प्रश्न मांडत असतात. संसदेतील कामकाजीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्याचबरोबर या यादीमध्ये राज्यातील आणखी तीन खासदारांनी स्थान मिळवले आहे. या खासदारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळेंचा समावेश आहे. श्रीरंग बारणेंनी दुसरा श्रीकांत शिंदेंनी ८ तर राहुल शेवाळेंनी मिळवला ९ वा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आलेल्या राज्यांमध्येही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तर सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खसदारांमध्येही खासदार सुप्रिया सुळे प्रथम क्रमांकावर आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या जास्त खासदारांचा या यादीमध्ये समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांचा लोकसभेत दबदबा असल्याचे समोर आले आहे.

या यादीत दुस-या राज्यातील खासदारांचा विचार करायचा झाल्यास तामिळनाडूचे सेंथीलकुमार एस, धनुष एम. कुमार, राजस्थानातील पी. पी चाैधरी, उत्तरप्रदेशातील पुष्पेंद्रसिंह चंदेल, अंदमान -निकोबारचे खासदार कुलदीप राय शर्मा, झारखंड राज्याचे खासदार विद्युत बरन महतो यांचा समावेश करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!