Latest Marathi News

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात धक्कादायक खुलासा

अनिक्षा जयसिंघानीचा जवाबात मोठा दावा, लाच व खंडणी देण्याच्या गुन्ह्यात नवा ट्विस्ट

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच आणि खंडणी देण्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानी हिने जबाबत आपण फॅशन डिझायनर नसल्याचे म्हटल्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच दिल्याचे प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात नवा खुलासा केला आहे.अमृता यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यापूर्वी अनिक्षा तिच्या वडिलांशी सविस्तर चर्चा करत असे. असा खुलासा पोलिसांनी केला आहे.अमृता फडणवीसांना अडकवण्यासाठी पिता-मुलगी मिळून योजना आखत असल्याचे स्पष्ट झाले आहे.इतकेच नव्हे तर, अमृता फडणवीसांनी अनिक्षाचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानंतर अनिल जयसिंघानीने त्यांना काही धमकीचे आणि ब्लॅकमेलिंग मेसेजही पाठवल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. तसेच समीक्षा ही फॅशन डिझायनर नसून विधी शाखेची विद्यार्थिनी असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनिक्षा आणि अनिल जयसिंघाणी बरोबर अनिक्षाचा नातेवाईक निर्मल जयसिंघानी हा देखील या प्रकरणातील आरोपी असून त्याचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. त्यामुळे आरोपींची संख्या तीन झाली आहे. महत्वाचे म्हणजे अमृता यांनी आपल्याला अडकवण्यासाठी तिने हे ड्रेस आणि ज्वेलरी वापरल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

अमृता फडणवीस यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी पिता-मुलीच्या दोघांविरुद्ध कट रचणे, खंडणी व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनिक्षा आणि नंतर तिचे वडील अनिल जयसिंघानी याला गुजरामधून अटक केली. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. दोघांची याप्रकरणात समोरासमोर बसून चौकशी केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!