ओमप्रकाश बकोरीया यांची बदली स्थगित करा अन्यथा..
आम आदमी पार्टीकडून बदली संदर्भात तीव्र संताप ; स्थगिती न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नियुक्तीनंतर अवघ्या नऊ महिन्यातच त्यांची बदल करत त्यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ति करण्यात आली आहे. ही बदली बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी तरी बकोरीया यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
बकोरीया हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे पीएमपीएलने चांगला वेग घेतला होता. पुण्यात वाढणाऱ्या रहदारीचा विचार करता डबल डेकर बस आणण्याच्या प्रयत्नात बकोरिया अतिशय नियोजनबद्ध काम ते करत होते. बकोरिया जवळपास नऊ महिन्यापूर्वी या संस्थेमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी आपल्या कामाची छाप ही पुण्यामध्ये दाखवली होती. अनेक निर्णय त्यांनी अतिशय वेगाने घेत वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम केली होती त्यामुळे पीएमपीएलचे उत्पन्न देखील वाढले होते. सर्व काम सुरुळीत सुरू असताना त्यांचा कार्यकाल संपण्याआधीच त्यांची अन्यायकारक बदली करण्यात आली आहे. बकोरीया यांची बदली पूर्णतः बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आणि राज्य माहिती आयोगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यात दिलेला आदेशाचे अवमान करणारी आणि दप्तर दिरंगाईच्या कायद्याचेही अवमान करणारी आहे. वास्तविक पाहता कोणत्याही शासकीय करणाऱ्याच्या कर्मचाऱ्यांची बदली ही त्याचा पूर्ण कालावधी म्हणजे तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय करणे चुकीचे आहे. परंतु अशा सर्रास बदल्याची प्रथा सध्या मंत्रालयामध्ये चालू आहे. बदल्या कशा आणि कधी कराव्यात या संदर्भामध्ये अनेक तरतुदी कायद्यात करण्यात आलेले आहेत.
ओमप्रकाश बकोरियाना पुन्हा पदभार द्यावी ही विनंती तसे न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा देण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, आम आदमी पार्टी पुणेच्या रस्ते व सार्वजनिक वाहतुकचे सेनथील अय्यर, आम आदमी पार्टीचे कामगार आघाडीचे संजय कोणे, सोशल मीडियाचे अक्षय धावडिकर, मिडियाचे अमित म्हस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.