Just another WordPress site

पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा न दिल्याने बिल्डरवर गुन्हा दाखल…! बघा नेमकी बातमी काय…?

पुण्यात रोजच फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. रोज कुठे ना कुठे फसवणूक झाली अशी बातमी येतेच. प्रत्येकाला वाटत…पुण्यात आपलं स्वतःच एखाद घर असावं असं स्वप्न पाहतो. त्यासाठी रात्रीचा दिवस करतो, नोकरी करून किंवा छोटा मोठा व्यवसाय करून घरासाठी एक एक रुपया गोळा करतो. पण आता खरेदीखत बंद आहेत. त्यामुळे बिल्डर पैसे घेतात आणि घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला अडकवून ठेवतात. असेच प्रकार सध्या घडत आहेत.

50 लाख रुपये घेऊनही फ्लॅटचा ताबा न देऊन एका बिल्डरने फसवणूक केल्याची घटना भोसरी येथे घडली आहे. याबाबत राकेश मित्तल, वय 69 वर्षे, रा. बंडगार्डन पुणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीप ओरा व 69 वर्षे व अरुण वोरा, वय 35 वर्षे, दोघेही राहणार मुंबई या अरविंद विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2019 ते अद्याप पर्यंत या आरोपींनी फिर्यादीला फ्लॅट दिलेला नाही. आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना त्यांचे बोट क्लब रोडवरील ऑन कोर या बांधकाम साईटमध्ये चार बीएचके फ्लॅट देण्याचे अमिष दाखविले.

GIF Advt

या साईटसाठी सन 2017 मध्येच रेराची रवानगी घेतली असताना सुद्धा फिर्यादी यांची फ्लॅट ची रितसर बुकिंग न घेता अप्रमाणिकपणे फिर्यादी कडून बुकिंग करिता बिझनेस/सॉफ्ट लोनचे सुरुवात रुपये 50 लाख रक्कम घेऊन फिर्यादी यांना फ्लॅट दिला नाही. तसेच फिर्यादी यांची रक्कम परत न करता सदर रकमेचा परस्पर अपहार करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!