
प्रेमाच्या आणाभाका घेत तरुणीने प्रेमविवाह केला पण…
तीन महिन्यानंतर पायलसोबत काय घडल?, गुलाबी संसारात घडल धक्कादायक?
बीड दि २३(प्रतिनिधी)- अलीकडे विवाहितेवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. आता तर प्रेम विवाह केलेल्या एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेम विवाह करुणही तरूणीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पायल आदेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल चौधरी आणि सांगवी येथील आदेश चौधरी या दोघांचं काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाआधी दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. लग्नानंतर पायल आणि आदेश यांचा संसार सुरु झाला. सुरुवातीचे काही महिने आनंदात गेले. पण त्यानंतर मात्र त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. दोघांमध्ये वाद होत होतेच पण नंतर साधूकडून देखील छळ होऊ लागला. त्यामुळे पायल सतत तणावात असायची घटनेच्या दिवशी देखील घरात वाद झाला होता. नवरा नगरला गेला असता आणि सासू शेतातील काम करायला गेले असता पायलने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. ही माहिती समजल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.
पायलच्या मामाच्या तक्रारीवरून त्यांनी नवरा आदेश आणि सासू अलका चौधरी यांच्याविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पायलचा नवरा आणि सासू या दोघांनाही ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.