Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो

महायुतीतील आमदाराचा भाजपावर हल्लाबोल, महायुतीत नाराजी चव्हाट्यावर, टिकेनंतर भाजपाकडून सारवासारव

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात जरी महायुतीचे सरकार सत्तेत असले तरीही युतीत मतभेद होताना दिसत आहेत. त्यातच शिंदे गटाकडून अनेकदा टिका होताना पहायला मिळते. आता पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी युतीतील मोठा पक्ष भाजपावर जोरदार टिका केली आहे. त्यामुळे युतीत आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.

प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार टिका केली आहे. भाजपची मिठी ही अफझलखानासारखी आहे, ते मित्र म्हणून जवळ घेतात आणि नंतर अफझलखानासारखा वार करतात, असे म्हणत कडू यांनी भाजपाला सुनावले आहे. हिंगोली दौऱ्यावर असलेले बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, एकीकडे सत्तेत सहभागी करून घ्यायचे आणि दुसरीकडे खच्चीकरण करायचे हे योग्य नाही. ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्याशी प्रामाणिक असले पाहिजे, आमच्यासोबत दगा फटका होऊ शकतो तर जनतेसोबतही होऊ शकतो. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते, असे कडू म्हणाले. भाजपाकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम केले जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडे यांना लक्ष घालण्यास सांगितलं. पण, बोलून कुणी लक्ष घालत नाही. असे म्हणत त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे. याआधीही कडू यांनी भाजपावर अनेकदा टिका केली आहे. बच्चू कडू हे महायुतीतील घटक पक्षापैकी एक असून राज्य शासनाच्या वतीने त्यांना मंत्री दर्जा देण्यात आला आहे. तरीही भाजप आणि त्यांच्यात सतत खटके उडताना दिसत आहेत.

काही करून बच्चू कडू यांना आगामी निवडणुकीत पाडा असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होते. पण आता मात्र बच्चू कडू यांना भाजपकडून कोणताही त्रास दिला जात नाही. तसेच बच्चू कडू यांना अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करू असा विश्वास देखील बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!