पुण्यातील कोंढवा परिसरातील या हाॅटेलला भीषण आग
आगीचे कारण अद्याप अस्षष्ट, आगीत हाॅटेलचे प्रचंड नुकसान
पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ७ व्या मजल्यावर हे हॉटेल असल्याने आग वाढतच होती.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार कोंढाव्यातल्या लुल्लानगर चौक परिसरात एक प्रसिद्ध हॉटेल आहे. पहाटेच्या सुमारास हॉटेलमधील वरच्या मजल्यांवरून धूर निघत असल्याचे निवासी नागरिकांना दिसले पण क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले.आग लागल्यानंतर सिलेंडरचेही स्फोट झाले असल्याची माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भीषण आगीमुळे हॉटेलमध्ये प्रवेश करताना अडथळे निर्माण होत आहेत. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून हॉटेलचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
आग लागलेल्या इमारतीत अनेक दुकाने, ऑफिस, आणि सोन्याची दुकाने आहेत. आग पसरू नये यासाठी पायत्न करण्यात येत आहेत. या आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अद्याप अधिकृत माहिती प्रशासनानतर्फे देण्यात आलेली नाही.