बाॅलीवूडच्या या अभिनेत्रीच्या त्या कृतीचे सोशल मिडीयावर काैतुक
अभिनेत्रीचा तो साधेपणा पाहून चाहते भारावले, छोट्याश्या कृतीने जिंकले फॅन्सचे मन
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- अभिनेत्री क्रिती सेनननेची बाॅलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तिच्या चित्रपटांमुळे तर ती चर्चेत असतेच. पण यावेळेस अभिनेत्रीने असे काही केले आहे ज्यासाठी ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असुन तिचे काैतुक होत आहे.
अभिनेत्री क्रिती सेननने अलीकडेच इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसली. तिचा इंदूरच्या फ्लाइटचा इनसाइड व्हिडिओ समोर आला आहे. या फ्लाइटमध्ये कृती एका चिमुकलीसोबत खेळताना दिसतेय. क्रितीच्या साधेपणानेच चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. खरेतर क्रितीने काळ्या फेस मास्कसह उन्हाळी पांढरा पोशाख घालून तिने लो प्रोफाइल ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील एका प्रवाशाने तिला ओळखले आणि तिचा लुक कॅमेरात व्हिडिओ शूट केला. सोशल मीडियावर क्रितीचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये क्रिती फ्लाइटच्या आत व्हाइट ड्रेसमध्ये दिसतेय. तिने ड्रेसवर एक शाल कॅरी केली असून चेहऱ्यावर मास्कदेखील लावला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्रिती फ्लाइटमध्ये एका लहान मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे. क्रिती सेननपूर्वी याआधी बॉलिवूडचे इतर आणखी काही स्टार्सनीही असा प्रवास केल्याने ते प्रसिद्धीझोतात आले आहेत. यापूर्वी दीपिका पदुकोण आणि कार्तिक आर्यन यांनीही इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केला होता. पण क्रितीचे काैतुक होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी कौतुक केले क्रितीच्या या व्हिडिओवर चाहते भरभरुन कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिला क्युट म्हटले आहे तर अनेकांनी लहान मुलीसोबत तिने केलेल्या मस्तीचे काैतुक केले आहे.
क्रिती सेननच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर क्रिती अखेरची कार्तिक आर्यनसाेबत ‘शेहजादा’ चित्रपटामध्ये दिसली होती. मात्र, रोहित धवन दिग्दर्शित हा कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. अशात आता क्रिती आणि प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा १६ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित हाेत आहे.