Latest Marathi News
Ganesh J GIF

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

'माही'च्या त्या वक्तव्याने वाढली चाहत्यांची अस्वस्थता, यंदा शेवटचा आयपीएल?

चेन्नई दि २२(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते देशभरात आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जरी घेतली असली तरी त्याची जादू आणि चाहत्यांच्या मनातील स्थान अजूनही कायम आहे. जेंव्हापासून आयपीएलचा हा मोसम सुरू झाला आहे, तेव्हापासून महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत अटकळ आणि प्रश्न सुरूच आहेत. आता धोनीनेच यावर महत्वाचे विधान केले आहे.

चेपॉक स्टेडियमवरील हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत बोलताना चाहत्यांना धक्का दिला. हर्षा भोगलेसोबत मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना धोनी म्हणाला की, चेपॉकवर खेळणं खूप छान वाटत. इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे. तसेच हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे जितका खेळेल त्याचा त्याला पूर्ण आनंद घ्यायचा आहे असं धोनीने म्हंटल. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या पोटात गोळा आला आहे, कारण धोनीने त्याच्या निवृत्तीवर थेट भाष्य केलं आहे. अर्थात धोनीने यावर्षीच निवृत्त होणार की नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही परंतु आपण करिअरच्या अंतिम टप्प्यात आहे असं त्याने म्हंटल्यामुळे तो कधीही निवृत्ती घेऊ शकतो. दरम्यान, या सामन्यात धोनीने मयंकला स्टंपआउट करून आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. धोनीने आपला २४० वा समाना खेळत असताना, विकेटच्या मागे अप्रतिम स्टंपिग करताना एका फलंदाजांला २०० वेळा बाद करणारा आयपीएल मधील पहिला यष्टीरक्षक बनला आहे. याशिवाय, टी-२० क्रिकेटमध्ये धोनी सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत पहिला यष्टीरक्षक बनला आहे, ज्याने एकूण २०८ घेतले आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तीन वर्षापूर्वी निवृत्ती घेतली आहे.

महेंद्रसिंग धोनी २००८ पासून चेन्नई सुपर किंग्सचा आधारस्तंभ आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल ४ वेळा आयपीएल चषक जिंकला असून आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ म्हणून चेन्नईकडे पाहिले जाते. धोनीने अनेकदा चेन्नईला एकहाती सामने जिंकवून दिलेलं आहेत. धोनीमुळेच चेन्नईच्या संघाला अनेकांचा मोठा पाठिंबाही आधीपासून मिळत आहे .

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!