ईडीच्या चाैकशीमुळे उपमुख्यमंत्र्याच्या पत्नी बेशुद्ध
बारा तासाच्या चाैकशीमुळे बेशुद्ध होऊन कोसळली पत्नी, बघा काय घडले
पटना दि ११(प्रतिनिधी)- ईडीने आज बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे टाकले. यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे. पण यावेळी लालू प्रसाद यादव यांची सून आणि तेजस्वी यादव यांची पत्नी राजश्री या बेशुद्ध पडल्या.
लॅण्ड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी १२ तास यादव कुटुंबीयांची चौकशी केली. चौकशी सुरू असतानाच तेजस्वी यादव यांची गरोदर पत्नी राजश्री यादव यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर राजश्री यादव या बेशुद्धच पडल्या. त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव यांच्या पत्नीची प्रकृती सध्या स्थिर आहे. जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआय सतत लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाची चौकशी करत आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली आणि पाटण्यात लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांची चौकशी केली आहे. ईडीने २४ ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीत ईडीने ७० लाख रूपयांची रक्कम, दीड किलो सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त केलं आहे. तेजस्वी यादव यांच्या पत्नीचं नाव राजश्री असून सध्या त्या प्रेग्नंट आहे. डिसेंबर २०२१ मध्ये तेजस्वी यादव आणि राजश्री लग्नबंधनात अडकले होते. तेजस्वी यांच्या पत्नीचे नाव एलेक्सिस उर्फ राशेल गोडिन्हो होते.पण लग्नानंतर त्यांचे नाव राजश्री ठेवण्यात आले आहे.

लँड फॉर जॉब्स म्हणजे जमिनीच्या मोबदल्यात नोकरी हे 14 वर्षं जुनं प्रकरण आहे. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री होते त्यावेळी रेल्वेत ग्रुप डी पदावर पर्यायी म्हणून भरती करण्यात आलं. या उमेदवारांच्या कुटुंबीयांनी जमिनीचा व्यवहार केल्यानंतर त्यांना कायमस्वरुपी करण्यात आले. या जमिनी कमी किंमतीत खरेदी करण्यात आल्या असा सीबीआयचा दावा आहे.