Latest Marathi News
Ganesh J GIF

अभिनेत्रीला ‘या’ चित्रपटानंतर मिळत नाहीये बॉलिवूडमध्ये काम

बाॅलीवूडमधील 'ती' बाजू मांडताना म्हणाली,मी लोकांकडे कामासाठी हात पसरु..

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- चित्रपट सृष्टी सर्वाधिक बेभरवशाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कारण ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने कंगना रनोटच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते. मात्र त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.आता अंकिताने बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.


अंकिताने सांगितल्यानुसार,  “कलाविश्वात माझा कोणी गॉडफादर नाहीये. माझ्यात टॅलेंट आहे. पण, एखादं काम आलं तर मी ते स्वीकारणं किंवा नाकारणं या गोष्टी घडू शकतात ना. बॉलिवूड फार वेगळं आहे. अनेक जण म्हणतात, की माझ्याकडे चांगल्या ऑफर येत नाहीये. पण, तसं नाहीये. माझ्याकडे कोणतीही ऑफर आलेली नाही. त्यामुळे नकार द्यायचा प्रश्नच नाही. आणि, मी कोणाकडेही काम मागायला जाऊ शकत नाही. लोकांकडे माझ्या टॅलेंटची कदर करायला वेळ नाही.’ती म्हणाली, ‘जिथे माझ्या कामाचा सन्मान होत आहे असे मला वाटेल. तिथेच मी काम करेन.’ असं म्हणत अंकिताने तिची व्यथा मांडली आहे.अंकिताच्या मणिकर्णिका चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण आता तिला काम मिळत नसल्याच्या खुलाश्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. २०१९मध्ये अंकिताने कंगनाच्या मणिकर्णिका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही.


अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबतची तिची जोडी चांगलीच गाजली. मालिकेदरम्यानच दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. अंकिताने २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. पण सोशल मीडियावर ती बरीच अ‍ॅक्टिव असून तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!