Latest Marathi News

‘या’ अभिनेत्रीला रोज येतात जीवे मारण्याच्या धमक्या

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, पतीच्या जाॅबमुळे इन्स्टाग्राम धमक्यांनी भरलेले

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- जगात सेलिब्रेटींवर प्रेम करणारे जसे चाहते असतात तसे त्यांच्या दुस्वास करणारे लोक असतात. त्यांच्याकडून बरेचदा सेलिब्रेटींना लक्ष्य केले जाते. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर अलिकडेच क्रांतीने प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये भाग घेतला होता, त्यात तिने मोठा खुलासा केला आहे.

क्रांती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत असते. दोन वर्षांपुर्वी आर्यन खान ड्रग्न प्रकरणाचा देशभर गाजावाजा झाला होता त्यामुळे राजकारणही पेटलं होते. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर तऱ्हेतऱ्हेचे आरोप करण्यात आले होते. यावर या कार्यक्रमात क्रांतीने मोठा खुलासा केला आहे. या कार्यक्रमात क्रांती म्हणाली की, “अंडरवर्ल्ड आणि वेडे चाहते या दोन गोष्टींपासून सगळ्यात जास्त धोका असतो?. ड्रग्ज आणि अंडरवर्ल्डचा थेट संबंध असल्याने ते कुणाचा घर-परिवारसुद्धा बघत नाहीत. ते तुम्हाला डायरेक्ट संपवतात. दुसरी भीती वेड्या चाहत्यांकडून असते. ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही उभे आहात, ती मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे हे भय मी रोज जगते आहे. माझ्या इन्स्टाग्राममध्ये नुसते धमक्यांचे मेसेज आहेत. तुम्हाला जाळून टाकू, तुमच्या कुटुंबाला संपवून टाकू, असे मेसेज मला येतात”, असे ती म्हणाली आहे. तसेच क्रांती आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या मुलींपासून ते नवऱ्यापर्यंतच्या सर्व गोष्टी ती सांगत असते. मात्र क्रांतीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून तिच्या चाहत्यांना माहित नाही. त्या तिने पडल तर घ्या कार्यक्रमात सांगितल्या आहेत. त्याचा प्रोमो आला आहे. या कार्यक्रमात क्रांतीने मला सिद्धार्थ जाधव बरोबर डेटवर जायला नक्कीच आवडेल, असा खुलासा केला होता.

‘कोंबडी पळाली’ या गाण्याच्या तालावर सगळ्यांनाच थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. ती सध्या तिच्या आगामी ‘रेनबो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात अभिनेत्री उर्मिला कोठारे, ऋषी सक्सेना हे कलाकार झळकणार आहेत. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!