Latest Marathi News

बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला महिलेच्या पतीच्या खुनाचा उलगडा

धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, बघा दरबारात काय घडले

गुरुग्राम दि १२(प्रतिनिधी)- बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलीकडच्या काळाता सातत्याने चर्चेत आहेत. दिव्यशक्ती आणि चमत्काराचे व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. आता धीरेंद्र कृष्णा शास्त्रींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी एका महिलेच्या पतीच्या मृत्यूचा उलगडा केला आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री दरबारात आलेल्या लोकांमधून पतीच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेल्या स्टेजवर यावे, असे सांगतात. त्यानंतर एक महिला स्टेजवर येते. तिच्याबरोबर पतीचा फोटो असतो. तिला धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, पतीच्या हत्येचं रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहात. पतीचा खून झाला असून, नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला आहे. शत्रू तुमच्या जवळपास फिरत आहेत. तुमच्यावर दबाव टाकला जात आहे. पतीच्या मृत्यूचं रहस्य समोर येत नाही आणि सीआयडी चौकशी होत नाही, तोपर्यंत तुम्ही आपले केस धुणार नाही. या प्रकरणी सीआयडी चौकशी होईल. सध्या तुमचे केस धुवू नका. हनुमानजींची इच्छा असेल, तर लवकरच केस धुण्याची वेळ येणार आहे. अशी भविष्यवाणी शास्त्रींनी केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या चमत्काराचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. बाबा आपल्या लग्नाच्या विधानावरुनही चर्चेत आले होते.

बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी छिंदवाड्याचे आयुर्वेदाचार्य डॉ. प्रकाश टाटा यांनी पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यासह जगभरातील बाबांना आव्हान दिले आहे.बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!