अभिनेत्री म्हणाली ‘त्या दिग्दर्शकाने मला खोलीत बोलावले आणि…
कास्टिंग काऊचबाबत केला खळबळजनक खुलासा, शेअर केला अनुभव
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये अभिनेत्रींना कास्टिंग काउचमधून जाणे ही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या करिअरमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. पण अनेकदा यावर बोलणे टाळले जाते. अभिनेत्री विद्या बालन हिने तिला आलेला एका वाईट अनुभवावर भाष्य केले आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
विद्या तिला आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाली की, मी खूप भाग्यवान आहे की माझ्याकडे कास्टिंग काउचसारखी घटना घडली नाही, मी अनेक धोकादायक कथा ऐकल्या आहेत आणि हेच माझ्या आई-वडिलांना सर्वात मोठी भीती आहे की त्यांना मी चित्रपटात येऊ इच्छित नाही. मला आठवते की चेन्नईत एका जाहिरात चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात एका दिग्दर्शकासोबत माझी भेट झाली होती. दिग्दर्शकाने मला जाहिरातीसाठी कन्फर्म केले आणि जेव्हा मी त्यांना एका कॉफी शॉपमध्ये भेटले तेव्हा त्यांनी मला वारंवार आपल्या खोलीत येण्यास सांगितले. मी एकटी असल्यामुळे मला काही समजले नाही पण मी त्यावेळी योग्य निर्णय घेतला. खोलीत गेल्यावर मी दरवाजा उघडा ठेवला. यानंतर दिग्दर्शकाने काहीही जबरदस्ती केली नाही. अशा प्रकारे मी स्वतःला कास्टिंग काउचचा बळी होण्यापासून वाचवले. दिग्दर्शकाने कोणतेही संकेत दिले नाहीत, परंतु मला समजले की मी असुरक्षित आहे. मी दरवाजा उघडा ठेवल्यामुळे दिग्दर्शन नाराज झाला. आणि तो प्रोजेक्टही आपल्या हातून गेला.” असे विद्या म्हणाली आहे. विद्या बालन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. विद्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेत्री विद्या बालनला तिच्या उत्तम अभिनयामुळे ओळखले जाते. विद्या सोशल मीडियावरुन तिचे नवनवीन फोटो तसेच काही गमतीदार रील्स देखील शेअर करत असते. नुकतेच तिने एक बोल्ड फोटो शुट केले होते. हे न्यूड फोटोशूट पाहून अनेकांनी तिला ट्रोल देखील केले होते, तर काहींनी काैतुक केले होते.