Latest Marathi News

नाना पटोलेंचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद जाणार?

राज्यातील असंतुष्ट गटाची दिल्लीत तक्रार, पक्षातील नाराजीवर पटोले म्हणाले...

मुंबई दि १०(प्रतिनिधी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत पक्षातील गोंधळ समोर आला होता. या वादाचे खापर नाना पटोले यांच्यावर फोडण्यात आला आहे. त्यामुळे पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी पक्षातील एका गटाने आघाडी उघडली आहे.

काँग्रेसचे दोन माजी खासदार, चार माजी आमदारांसह शिष्टमंडळ दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत पटोले यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात लिहिलेल्या पत्रानंतर पक्षातील नाराजी समोर आली आहे. याआधीही पक्षातील एक शिष्टमंडळ २६ फेब्रुवारी रोजी रायपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची भेट घेत पटोलेंना हटवण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर पक्षातील २४ नेत्यांनी पटोले यांची हकालपट्टी करून शिवाजीराव मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली होती. नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद मिळणार की नाही, याचा निर्णय काँग्रेस पक्षाचे नेते घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सत्यजित तांबे यांची बंडखोरी आणि बाळासाहेब थोरात यांची नाराजी थंडावण्यापूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 

या सर्व घडामोडीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “काँग्रेसमध्ये कोणताही गोंधळ झाला नव्हता. गोंधळ निर्माण करण्याचं काम करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदल होणारच आहेत. जे काही फेरबदल होतील ते सर्वांना मान्य करावे लागतील.” असे सुचक विधान पटोले यांनी केले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!