Latest Marathi News
Ganesh J GIF

‘जॅकलिन फर्नांडिसवर ही अभिनेत्री सतत जळायची’

बाॅलीवूडवर लेटर बाॅम्ब, डेट करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा दावा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- आपल्या ठगेगिरीने चक्रावून टाकणार आणि आता २०० कोटी मनी लाॅड्रिंग प्रकरणात सध्या महाठग सुकेश चंद्रशेखर जेलमध्ये आहे. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याविरोधात देखील कोर्टात केस सुरु आहे. सुकेश चंद्रशेखरने आणखी एक खळबळजनक दावा करणारं पत्र लिहिलं आहे. त्यामुळे बाॅलीवूडमध्ये अनेक चर्चांना उधान आले आहे.


सुकेशने आपल्या पत्रात दावा केला आहे की, ‘नोरा फतेहीला नेहमी जॅकलीनचा हेवा वाटत असे त्यामुळे ती माझे ब्रेनवॉश करत होती. मी जॅकलीनपासून वेगळे व्हावे आणि तिला डेट करता यावे म्हणून नोरा जे शक्य असेल ते करत होती. नोरा मला दिवसातून किमान वेळा कॉल करायची आणि जर त्याने कधी फोन उचलला नाही तर सतत कॉल करायची. असा दावा पत्रात करण्यात आला आहे. त्याचबरोबर नोरा फतेहीनं तिचा जबाब आर्थिक गुन्हे ब्युरो समोर बदलला होता. असा खुलासाही त्याने केला आहे.अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिनवर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे. माझ्याकडून महागडी कार गिफ्ट घेण्याबद्दलही नोरा खोटं बोलत असल्याचं सुकेशने म्हटलं आहे. नोराला आपण जवळपास २ कोटी रुपयांची गिफ्ट दिल्या असून याची कोणतंही बिलं तिच्याकडे नाहीत, कारण या वस्तून तीने खरेदी केलेल्या नाहीत, असा गौप्यस्फोटही सुकेश चंद्रशेखरने केला आहे.


या प्रकरणी नवीन ट्विस्ट आला आहे. नोराने जॅकलीन फर्नांडिस विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नोरा फतेहीच्या बदनामीच्या तक्रारीवर २५ मार्चला सुनावणी निश्चित केली आहे. या प्रकरणात तिचे नाव चुकीच्या पद्धतीने ओढण्यात आल्याचा दावा नोराने केला आहे. तिचा सुकेशशी काहीही संबंध नाही. ती सुकेशला त्याची पत्नी लीना मारिया पॉस यांच्यामुळेच ओळखत होती. आता नोराच्या तक्रारीनंतर जॅकलिन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!