Latest Marathi News
Ganesh J GIF

Vodafone-Idea ची सेवा आज रात्रीपासुन बंद होणार

कर्जाखाली असलेल्या नेटवर्क कंपनीचा मोठा निर्णय, बघा काय म्हणाली कंपनी

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- जर तुम्ही वोडाफोन किंवा आयडीयाचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी
एक महत्वाची बातमी आहे कारण कंपनीने आजपासून म्हणजे २२ जानेवारीला रात्री ८ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी हा अलर्ट जारी केला आहे.

Vodafone-Idea कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. आता कंपनीने आपल्या प्रिपेड ग्राहकांना मेसेज पाठवला आहे की त्यांची २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजल्यापासून ही सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान ग्राहक फोन रिचार्ज करू शकणार नाहीत. ही सेवा १३ तास बंद राहणार आहे. प्रीपेड रिचार्ज सुविधा २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजल्यापासून बंद होईल. ही सेवा १३ तास बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी २३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० नंतर सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही Vodafone-Idea चे सिम वापरत असाल आणि तुमचा रिचार्ज या १३ तासात संपणार असेल तर आत्ताच रिजार्च करून घेतल्यास तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

Vodafone-Idea मोठ्या कर्जात आहे. परवाना शुल्कही भरण्यात कंपनीना अपयश येत आहे. Vodafone-Idea ला परवाना शुल्क म्हणून ७८० कोटी रुपये भरायचे होते पण ही कंपनी केवळ 78 कोटी रुपये  देऊ शकली आहे. म्हणुनच वोडाफोन – आयडियाने आतापर्यंत 5G सेवाही सुरू केलेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!